खेड शिवापूर टोलनाक्यावर ३२ लाख रूपये किंमतीचा ६ किलो चरस जप्त
--------------------
मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी बसमधून पुणे -सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर आज शुक्रवारी दि.८ ऑक्टोबरला पहाटे बत्तीस लाख रूपये किंमतीचा ६ किलो चरस जप्त करण्याची कारवाई राजगड पोलीसांनी केली.
याप्रकरणी मोस्ताकिन धुनिया या आरोपीला ताब्यात घेवून अटक केली.
मुंबई ते गोवा या मार्गावर धावणा-या डॉल्फिन ट्रॅव्हल्स मधून एक व्यक्ती चरस घेवून जाणार असल्याची माहिती मिळाल्यावरून राजगड पोलीसांनी आज शुक्रवारी दि.८ ऑक्टोबरला पहाटे खेड शिवापूर टोलनाक्यावर ट्रॅव्हल्स अडवून मोस्ताकिन धुनिया याला ताब्यात घेवून त्याच्याकडून ६ किलो चरस जप्त केले.
जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमीत कमी तीन कोटी रूपये असून भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत ३३ लाख रूपये अपेक्षित आहे.
भोर उपविभागाचे एस डी पी ओ धनंजय पाटील अधिक तपास करत आहेत.