कल्याण शहर भाजपच्या वतीने अजित पवारयांच्या वक्तव्या विरोधात आंदोलन
Raju Tapal
January 03, 2023
68
कल्याण शहर भाजपच्या वतीने अजित पवारयांच्या वक्तव्या विरोधात आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संभाजी राजे यांच्या बद्दल अपशब्द बोलले संभाजी राजे धर्मवीर नव्हते असे विधान केल्याने भाजप पक्षाकडून संताप व्यक्त होत आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार तसेच कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथील शिवाजी चौकात अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले व निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर, सोमनील काटे, दया गायकवाड, संजय कारभारी, कल्पेश जोशी, दिपक ब्रीद,मिरकुटे,प्रिया शर्मा, वैशाली पाटील, संगीता घोलप यांच्या सह आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की अजित पवार यांनी धर्मवीर संभाजी राजे बद्दल विधान केले आहे ते चुकीचे आहे, धर्मवीर असल्याचे अनेक पुरावे आहेत, चुकीचा संदेश व माहिती लोकांमध्ये पसरविणे हे काम राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे असे सांगितले.
Share This