कोकण विभाग मतदार संघासाठी आदर्श आचारसंहिता लागू....
Raju Tapal
December 30, 2022
79
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी
निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू
- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
ठाणे - भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये द्विवार्षिक निवडणूक घोषित केले आहे. त्यानुसार कोकण विभागामध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील यांची मुदत 7 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने दि. 29 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया घोषित केली आहे. त्यानुसार, निवडणुकीची अधिसूचना दि. 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2023 आहे. दि. 13 जानेवारी 2023 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून 16 जानेवारी 2023 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे. दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 4 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पात्र शिक्षक मतदारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. विधानपरिषदेच्या मतदारसंघातील निवडणुकामध्ये पालन करावयाच्या आदर्श आचारसंहितेबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान तसेच कोवीड 19 विषयीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिले आहे.
Share This