• Total Visitor ( 84754 )

कोमल शितोळेची अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Raju Tapal December 24, 2021 253

शिरूर महाविद्यालयातील कोमल शितोळे या विद्यार्थिनीची अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड 

 

शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील कोमल शितोळे  या विद्यार्थिनीची  कुस्तीच्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

सोमेश्वरनगर ता.बारामती  येथे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून तीची निवड अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धे साठी झाली आहे .

या विद्यार्थिनीने यापूर्वी  विंझर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत ७२ किलो वजन गटात  प्रथम क्रमांक मिळविला आहे .५७ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक वैष्णवी शेळके या विद्यार्थिनीचा तर ५५  किलो वजन गटात द्वितीय क्रमांक प्रतिक्षा चव्हाण या विद्यार्थीनीचा  आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा नसरापूर व विंझर येथे झाल्या.

या स्पर्धेत अदित्य जाधव या विद्यार्थ्याचा कुस्तीत दुसरा क्रमांक आला असून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .त्याच बरोबर रहाटनी  येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन  शूटिंग स्पर्धेत  ऋतुजा ठुबे या विद्यार्थीनीचा   द्वितीय क्रमांक आला असून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . तर  क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी  अनिकेत साठे या विद्यार्थ्याची  विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी  निवड झाली आहे .या विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. पी. एस .वीरकर ,प्रा .नारायण काळे व अनिल पांढरमिसे यांनी मार्गदर्शन केले असून या विद्यार्थ्यांचे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा ,सचिव नंदकुमार निकम , डॉ .के .सी मोहिते यांनी अभिनंदन केले आहे .

Share This

titwala-news

Advertisement