कोंढापुरीजवळ कारला ट्रकची धडक ; एकजण ठार
Raju Tapal
December 12, 2021
30
कोंढापुरीजवळ कारला ट्रकची धडक ; एकजण ठार
पुणे - नगर महामार्गावरील कोंढापुरी हद्दीत कारला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला.
दानिषअली साहबअली सय्यद असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून मोहम्मद मोनिसअली सय्यद, मोहम्मद नुमान महम्मद ऐजाज, रियान रऊफ पटेल सर्वजण रा.औरंगाबाद अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
पुणे - नगर महामार्गावरील कोंढापुरी हद्दीत अज्ञात ट्रकने एम एच २० एफ ३७९९ या क्रमांकाच्या कारला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह नगरच्या दिशेने पळून गेला.
मोहम्मद मोनिसअली सिकंदरअली सय्यद रा.जनाब पार्क औरंगाबाद यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताबाबत फिर्याद दिली. अज्ञात ट्रकचालकावर शिक्रापूर प़ोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Share This