कोंढापुरी ता.शिरूर येथील विद्यानिकेतन प्रशालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी
Raju tapal
October 02, 2021
43
आज शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी आर एम धारीवाल विद्यानिकेतन प्रशाला कोंढापुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य पांडुरंग दौंडकर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यालयातील आठवी ते बारावी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर आपापली मते,विचार भाषणातून प्रकट केले. तसेच विद्यालयातील शिक्षक प्रा. श्री.चंद्रकांत भोजने सर, प्रा.श्री.कार्तिककुमार सपकाळ सर, प्रा.श्री.मनोज कोल्हे सर यांनी आपली मते मांडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. पी. एम दौंडकर सर होते. प्राध्यापक संजय गजऋषी, प्राध्यापक आनंदा धोंडे, प्राध्यापक बापू खारतोडे, प्रा.चंद्रकांत भोजने, प्रा.कार्तिककुमार सपकाळ, प्रा.मनोज कोल्हे, प्रा.राजेंद्र धुमाळ, प्रा.आकाश गायसमुद्रे, प्रा.श्रीमती रूपाली नलावडे, प्रा.श्रीमती अश्विनी कोल्हे, प्रा.श्रीमती दिपाली गेजगे,शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री.आनंदा धोंडे सर यांनी केले.
Share This