कोणत्याही मालमत्तेवर, संपत्तीवर दावा नाही ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तर उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा;
आम्ही कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. त्याच्या कोणत्याही मालमत्तेवर आमचा दावा नाही.आम्हाला बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे त्यामुळे आम्हाला काहीही नको, तुम्हाला कोणीही काहीही सांगितल तरी विश्वास ठेवू नका.मी अधिकृत पणे सांगतो कोणत्याही संपत्तीवर आमचा दावा नाही. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे:-शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना भवनावर शिंदे गटाकडून दावा केला जाणार असल्याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवनावर दावा करणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट केले.शिवसेनेच्या कोणत्याही मालमत्तेवर आणि संपत्तीवर दावा केला जाणार नाही. मालमत्ता आणि संपत्तीचा मोह नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध समाज घटाकांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
शिवसेना नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. हा निर्णय मेरीटवर झाला आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेणे चूक आहे.न्यायव्यवस्थेचे काही अधिकार असतात.लोकशाहीत ही संस्था स्वायत्त आहेत. आयोगाच्या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे. मात्र निर्णय बाजूने लागला की चांगला आणि विपरीत लागला की अयोग्य असे म्हणणे चुकीचे आहे. नाव आणि चिन्ह मिळाल्याने विधिमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र कोणत्याही मालमत्तेवर किंवा संपत्तीवर दावा करायचा नाही. असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
भाजप-शिवसेनेने युती म्हणून निवडणूक लढविली. मात्र सत्तेसाठी, खुर्चीसाठी विचारांना तिलांजली देण्यात आली. कोणी काही आरोप करत असले तरी त्यावर बोलायचे नाही. खुर्चीसाठी विचारांना तिलांजली दिल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे, अशी टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली.दरम्यान, ब्राह्मण समाज नाराज नाही. विरोधकांकडून मुद्दामहून ही अफवा पसरवली जात आहे. कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला नाही, हे मतदार ठरविवात. त्यामुळे अजित पवार काही विधाने करत असली तरी त्यात तथ्य नाही. सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे जनता भाजप-शिवसेना युतीबरोबर आहे. कसब्यात युतीचा उमेदवार विजयी होईल, असे त्यांनी सांगितले.