• Total Visitor ( 84323 )

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात रंगणार निलेश राणे विरूद्ध वैभव नाईक सामना

Raju tapal October 22, 2024 15

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात रंगणार निलेश राणे विरूद्ध वैभव नाईक सामना

निलेश राणे शिवसेना शिंदे गटात उद्या बुधवारी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत कुडाळमध्ये करणार जाहीर प्रवेश.. 
वडिलांच्या पराभवाचा घेणार बदला

सिंधुदुर्ग:-कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे वैभव नाईक विद्यमान आमदार आहेत.याठिकाणी भाजपचे माजी खासदार निलेश राणे विधानसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छूक आहेत. परंतु महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार असल्याने त्यांनी धनुष्यबाणावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपुर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती.उदया बुधवारी सायंकाळी ४ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात येणार आहेत.तर कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे.याचवेळी भाजपचे माजी खासदार व नेते निलेश राणे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.अशी माहिती आज महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे श्री. निलेश राणे यांनी पत्रकार परिषदे दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून निलेश राणे यांच्याबाबत या मतदारसंघात चर्चा सुरू होती.तर त्यांनी कुडाळमधून जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. अशातच आता उद्या बुधवार दि.२३ ऑक्टोबर रोजी कुडाळमध्ये राजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.शिवसेनेकडून निलेश राणे यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.त्यामुळे आता ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक विरूद्ध शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे असा सामना रंगणार आहे.

दरम्यान, २००७ साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.त्यावेळी वैभव नाईक यांनी शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वैभव नाईक यांनी थेट नारायण राणे यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले. तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून या मतदारसंघात नारायण राणे यांनी विजय मिळवला. त्याचा बदला वैभव नाईक यांनी २०१४ च्या निवडणुकीत पुर्ण केला.तर २०१९ च्या निवडणूकीत देखील याठिकाणांहून वैभव नाईकांनी रणजित देसाई यांचा पराभव करत विजय मिळवला होता.आता या मतदारसंघातून निलेश राणे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा असून,निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी प्रवेश करणार आहेत.त्यामुळे शिंदे शिवसेकडून श्री.राणे यांनाच उमेदवारी मिळणार आहे.त्यामुळे वडिलांच्या पराभवाचा ते बदला घेणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहेत.
 

Share This

titwala-news

Advertisement