• Total Visitor ( 84491 )

लाचलुचपतचे शुक्लकाष्ठ संपेना

Raju Tapal March 01, 2023 48

लाचलुचपतचे शुक्लकाष्ठ संपेना;
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या हाॅटेल-घरापर्यंत पोहोचले....
तेली आळीतील जुने घर, हॉटेल,तर खालच्या आळीतील नवीन घराचीही घेतली मापे
आमदार राजन साळवी यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय्य सहाय्यक सुभाष मालप आणि ठेकेदारांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाते. त्यासाठी या सर्वांना रायगड कार्यालयात हजर राहावे लागते. त्यामुळे वैतागलेल्या आमदार साळवी यांनी,एकदाचे काय ते करा, मला आत टाका. परंतु कुटुंबियांना त्रास देऊ नका,अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील उध्दव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यामागे लाचलुचपत विभागाच्या चौकशीचे लागलेले शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाही, अशी सद्यस्थिती आहे. ही चौकशी संपण्या ऐवजी अधिकच खोलात जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण अधिक चौकशीसाठी अधिकारी साळवी यांच्या जुने घर-हॉटेल आणि नवीन घराची मापे घेण्यापर्यंत तपासणीसाठी पोहोचले आहेत.
रायगड जिल्ह्यातील लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार रत्नागिरीतीलe सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी आमदार साळवी यांच्या येथील तेली आळीमध्ये असलेल्या जुन्या घराची व मुख्य मार्गावरील तेली आली नाका येथील हॉटेलची मोज मापे घेतली. त्यानंतर खालची आळी परिसरातील नव्या घराचीही मापे घेण्यात आली. सुमारे अडीच तास ही प्रक्रिया सुरू होती. त्यांचे मोठे बंधू दीपक साळवीही तेथे उपस्थित होते. बांधकाम विभागाकडून याबाबतचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड येथील कार्यालयाला पाठवला जाणार आहे.
आमदार राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीची नोटीस गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पाठवली होती. त्यानुसार गेल्या २० जानेवारी रोजी मालमत्तेची कागदपत्रे घेऊन साळवी यांनी या विभागाच्या रायगड येथील कार्यालयात गेले होते.  त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी त्यावेळी करण्यात आली. आमदार साळवी यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनी समाधान न झाल्याने आणखी काही कागदपत्रे लाच लुचपत विभागाने मागवली. गेल्या महिन्यात तीही देण्यात आली. त्या भेटीमध्ये लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेसात तास चौकशी करून अजूनही काही कागदपत्रांची माहिती मागवली आहे.यावर, आत्तापर्यंत झालेल्या चौकशीने त्यांचे समाधान होत नाही, हा त्यांचा किंवा माझा दोष असेल. मात्र चौकशीत मी निर्दोष सुटणार, असा विश्वास आमदार साळवी यांनी चौकशीनंतर कार्यालयाबाहेर आल्यानंतर व्यक्त केला.
आमदार राजन साळवी यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय्य सहाय्यक सुभाष मालप आणि ठेकेदारांचीही चौकशी करण्यात आली आहे.त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाते. त्यासाठी या सर्वांना रायगड कार्यालयात हजर राहावे लागते. त्यामुळे वैतागलेल्या आमदार साळवी यांनी,एकदाचे काय ते करा, मला आत टाका. परंतु कुटुंबियांना त्रास देऊ नका,अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Share This

titwala-news

Advertisement