लागीर झालं जी मालिकेतून गाजलेला लोकप्रिय अभिनेता ज्ञानेश माने यांचे निधन
लागीर झालं जी या झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेले अभिनेते ज्ञानेश माने यांचे अपघाती निधन झाले.
पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करताना मानेंच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. घाटातील वळणावर झालेल्या अपघातात ज्ञानेश माने बेशुद्ध झाले होते.
रूग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालविली होती.
ज्ञानेश माने पेशाने डॉक्टर.होते. अभियानाची आवड असल्याने त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. ते मूळ पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जरडगावचे.रहिवासी होते..त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.
लागीर झालं जी या मालिकेत ज्ञानेश माने यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय सोलापूर गँगवार, काळूबाईच्या नावानं चांगभलं,अंबूज, हंबरडा, यासारख्या चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या होत्या.
ज्ञानेश माने यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांवर शोककळा पसरली आहे.