• Total Visitor ( 134242 )

चार महिन्यानंतर विधिमंडळाच्या समित्या जाहिर

Raju tapal March 28, 2025 6

चार महिन्यानंतर विधिमंडळाच्या समित्या जाहिर

मुंबई :- राज्य सरकारकडून मागील कालावधीतील केलेल्या चूकीमध्ये सुधारणा करत यावेळी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सत्तेवर आपले बस्तान बसविल्यावर चार महिन्याच्या कालावधीनंतर राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यावरील नियुक्त्या जाहिर केल्या आहेत. विशेष म्हणजे या समित्यांवर महायुतीतील आमदारांचाच वरचष्मा कसा राहिल याकडे महायुती सरकारने लक्ष दिले आहे.

राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या बुधवारी उशिरा जाहीर करण्यात आल्या. विधिमंडळ समित्यांमध्ये महत्वाची मानली जाणारी लोकलेखा समिती काँग्रेसला मिळाले असून समितीचे प्रमुख म्हणून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधिमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत गठीत करण्यात  आलेल्या संयुक्त समितीचे प्रमुखपद वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

अंदाज समितीच्या प्रमुखपदी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सार्वजनिक उपक्रम समितीच्या प्रमुखपदी ऍड. राहुल कुल, पंचायत राज समितीच्या प्रमुखपदी संतोष दानवे, रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी सुनील शेळके, उपविधान समितीच्या प्रमुखपदी प्रतापराव पाटील - चिखलीकर, अनुसूचित जाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी नारायण कुचे, अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी दौलत दरोडा, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी सुहास कांदे, महिला, बालहक्क आणि कल्याण समितीच्या प्रमुखपदी मोनिका राजळे, इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या प्रमुखपदी किसन कथोरे, अल्पसंख्याक कल्याण समितीच्या प्रमुखपदी मुरजी पटेल, मराठी भाषा समितीच्या प्रमुखपदी अशोक काळे याची नेमणूक झाली आहे.

विधानसभा विशेषाधिकार समितीच्या प्रमुखपदी नरेंद्र भोंडेकर, विनंती अर्ज समितीच्या प्रमुखपदी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आश्वासन समितीच्या प्रमुखपदी रवि राणा, नियम समितीच्या प्रमुखपदी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सदस्य अनुपस्थिती समितीच्या प्रमुखपदी डॉ. किरण लहामटे, अशासकीय विधेयके आणि ठराव समितीच्या प्रमुखपदी चंद्रदीप नरके, सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबत तदर्थ समितीच्या प्रमुखपदी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सदस्यांचे वेतन आणि भत्ते याबाबतच्या संयुक्त समितीच्या प्रमुखपदी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रंथालय समितीच्या प्रमुखपदी विधानपरिषद सभापती राम शिंदे तर सहसमिती प्रमुख म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निवास व्यवस्था समितीच्या प्रमुखपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आहार व्यवस्था समितीच्या प्रमुखपदी डॉ. बालाजी किणीकर, धर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी करण्याच्या संदर्भातील समितीच्या प्रमुखपदी विधी आणि न्याय राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement