कोरेगाव मूळ येथे कुत्र्याच्या पिलांवर बिबट्याचा हल्ला
शिरूर:- हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे कुत्र्याच्या पाळीव पिलांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मध्यरात्री घडली. कोरेगाव मूळ येथील चवरूका मळा वस्ती येथे दोन घरगुती पाळीव कुत्र्यांना बिबट्या घेवून गेला आहे.कुत्र्याच्या पिलांना बिबट्याने मारून टाकले आहे असे कोरेगाव मूळ येथील .सचिन माऊली कड देशमुख यांनी कळविले. बिबट्या आपल्या परिसरात फिरत असल्याने कोरेगाव मूळ ग्रामस्थांनी आपल्या जनावरांची तसेच आपली काळजी घ्यावी असे आवाहन कोरेगाव मूळ येथील सचिन माऊली कड देशमुख यांनी केले आहे.