• Total Visitor ( 369912 )
News photo

लिलाबाई ढोकले पाटील यांचे निधन 

Raju tapal January 02, 2026 52

लिलाबाई ढोकले पाटील यांचे निधन 

          

शिक्रापूर:- 

शिरूर तालुक्यातील करंदी येथील जुन्या पिढीतील धार्मिक प्रवृत्तीच्या  लिलाबाई‌ दत्तोबा ढोकले‌ पाटील यांचे आज शुक्रवार दि.२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे वयाच्या ९० व्या वर्षी हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे वृद्धापकाळाने निधन झाले. कोरेगाव मूळ येथील मुळा -मूठा नदीकाठी स्मशानभूमीत त्यांच्यावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे जावई विलासराव वाघ यांनी त्यांच्या चितेस अग्नी दिला. त्यांच्या पश्चात ३ विवाहीत मुली,जावई,नातू,नाती असा परिवार आहे.हवेली तालुका शिवसेनेचे आप्पासाहेब कड देशमुख,सामाजिक कार्यकर्ते सचिन माऊली कड देशमुख,गुलटेकडी पुणे येथील आडतदार व्यापारी कांतीलालशेठ साबळे,शिवाजीराव धुमाळ,महाराष्ट्र आपला न्यूजचे पत्रकार विजयराव ढमढेरे,प्राध्यापक आशुतोष ढमढेरे,करंदी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गोरक्ष ढोकले पाटील,रामचंद्र ढोकले पाटील पंढरीनाथ ढोकले पाटील,.गणेशराव धुमाळ,रूपेश ढमढेरे प्रवीण उजेगर,नितेश खोत,बाळासाहेब ढोकले पाटील,रामदास ढोकले‌ पाटील,संतोष कुशाबा ढोकले‌ पाटील,दादासाहेब ढोकले‌ पाटील,बळीराम शिवले यांच्यासह राजकीय,सामाजिक शैक्षणिक,धार्मिक,व्यापार,उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी अंत्यसंस्कारास उपस्थित होते. लिलाबाई‌ ढोकले‌ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करताना करंदी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गोरक्ष ढोकले पाटील म्हणाले,लिलाताई‌ यांनी पतीच्या निधनानंतर शेती व्यवसाय सांभाळला.त्या अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. 

       


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement