साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांना उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर
शिरूर :- मधुश्री प्रकाशन पुणे या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या उत्कृष्ट काव्य पुरस्कार स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या "जय जय महाराष्ट्र बोला "या कवितेला द्वितीय क्रमांक मिळाला असून या वर्षीचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर झाला असल्याचे संयोजक पराग लोणकर यांनी सांगितले. मधुश्री प्रकाशम पुणे यांच्याकडून उत्कृष्ट काव्य पुरस्कारासाठी काव्य स्पर्धा घेण्यात आली होती. या काव्य स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या "जय जय महाराष्ट्र माझा" या कवितेने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना संयोजन समितीने उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर केला असून लवकरच पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार असल्याचे मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक तथा संयोजक पराग लोणकर यांनी सांगितले. मधुश्री प्रकाशम पुणे यांच्याकडून यावर्षी भव्य काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत अनेक नामवंत व नवोदित कवींनी भाग घेतला होता. याचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून मकरंद घाणेकर यांच्या महाभारत या कवितेला प्रथम,सचिन बेंडभर यांच्या जय जय महाराष्ट्र बोला या कवितेला द्वितीय तर अशोक भांबोरे यांच्या झाड या कवितेला तृतीय उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर झाले. जया गाडगे यांच्या कात कवितेला व काजल शिंदे यांच्या एक स्वप्न बाबा या कवितेला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले. याशिवाय याशिवाय हर्षवर्धन सोनवणे यांच्या शेवटचं पान,मुक्तेश्वर मुळे यांच्या कोण तू,डॉ. छाया निटुरे भिसे यांच्या ऑफिसला जाताना,सुनील भातंब्रेकर यांच्या आम्ही आणि तू,रामेश्वर तोंडे यांच्या शिक्षण,डॉ. प्रवीण मोरे यांच्या काळजाचा गर्भ,ललित बोरकर यांच्या लढ तू,प्राजक्ता जाधव यांच्या रांजण,अंजली महाजन यांच्या टाळी,तर डॉक्टर स्मिता सहस्रबुद्धे यांच्या पुस्तकांचे मनोगत या कवितांनाही उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.