• Total Visitor ( 84211 )

महाराष्ट्रात निवडणुका झाल्यास महायुतीला बहुमत!

Raju Tapal June 15, 2023 117

महाराष्ट्रात निवडणुका झाल्यास महायुतीला बहुमत!

राज्यात सत्तेत आल्यापासून भाजपा-शिवसेना महायुतीने विकास कामांचा जोरदार धडाका लावला. महायुती सरकारचे काम लोकांना प्रचंड आवडले असल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.नजीकच्या भविष्यात राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यास कोणाची सत्ता येईल, याबाबत जनतेचे मत जाणून घेतले असता, महायुती 165 ते 185 जागांसह सत्तेत येणार असल्याचे यात दिसून आले.

मागील काही काळात राज्यातील अभूतपूर्व सत्तासंघर्ष सर्वांनीच अनुभवला आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडापासून महाविकास आघाडी सरकार कोसळेपर्यंत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या. अशातच राज्यात जनतेचा कौल काय, याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले.

नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, यावर जनमत सर्वेक्षण घेण्यात आले. यात जनतेने नोंदविलेली मते आश्चर्यकारक आहेत. एबीसी-सी व्होटरने हा सर्व्हे केला आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना महायुतीला 288 सदस्यीय विधानसभेत 165 ते 185 जागा मिळू शकतात. उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला 88 ते 118 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला दोन ते पाच जागा आणि इतर पक्षांना 12 ते 22 जागा मिळताना दिसत आहेत.

कोणत्या पक्षाला किती जागा?

*

Share This

titwala-news

Advertisement