महाविकास आघाडीत झाली बिघाडी
Raju tapal
October 25, 2024
110
महाविकास आघाडीत झाली बिघाडी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अर्चना घारे- परब बंडखोरीच्या तयारीत
सावंतवाडीतील वैश्य भवन मध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अर्चना घारे- परब यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन.
अर्चना घारे- परब या आजचं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार का? याकडे लागले लक्ष..
सिंधुदुर्ग :-सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राजन तेली यांचे नाव दोन दिवसांपुर्वी जाहीर करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे- परब या सावंतवाडी विधानसभा लढविण्यास इच्छुक होत्या.परंतु उमेदवारी न मिळाल्याने सौ.परब या नाराज झाल्या आहेत.अशातच आज आपली ताकद दाखवण्यासाठी अर्चना घारे- परब यांनी वैश्य भवन येथे कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला.या मेळाव्याला मोठी गर्दी झाल्याने मोठे शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्या बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अर्चना घारे- परब यांचा येथील जनतेशी असलेला दांडगा जनसंपर्क लक्षात घेता त्यांना उमेदवारी मिळायला हवी होती. त्यांच्या रूपाने स्वच्छ, प्रतिमा नविन चेहरा अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.असे असताना महाविकास आघाडीच्या या घोळक्यात त्यांना दुर ठेवण्यात आल्याने सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते नाराज झाले असून. त्यांनी अर्चना घारे परब यांना बंडखोरी करण्याचा आग्रह धरला असल्याने आज कार्यकर्त्यांच्या मेळावा घेवून अर्चना घारे-परब यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे.आजचं त्या आपली उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजते.
Share This