महिलांना उद्योग व्यवसायात केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे - माजी आमदार नरेंद्र पवार
Raju Tapal
January 12, 2023
37
महिलांना उद्योग व्यवसायात केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे - माजी आमदार नरेंद्र पवार
वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनेचे उद्घाटन संपन्न
भारत रेल्वे मंत्रालय द्वारा वन स्टेशन वन प्रॉडक्ट आत्मनिर्भर भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून मुलुंड रेल्वे स्टेशन येथे रेणुका महिला औद्योगिक संस्था मर्यादित नाशिक या संस्थेतर्फे पैठणी साडी व सर्व प्रॉडक्ट खादी केंद्राचे उद्घाटन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. दरम्यान केंद्र सरकारच्या योजनेतून महिलांनी तयार केलेल्या माल सहज विकता यावा यासाठी सरकारने ही योजना आणली आहे, लोकल फॉर व्होकल या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी माल तयार झाला त्याच ठिकाणी विक्री केंद्र अशी संकल्पना मोदीजींनी आणल्याबद्दल महिलांना न्याय मिळाला. यामुळे महिला शक्तीच्या हाताला काम लागेल महिलांना मार्केट उपलब्ध करून दिले आहे, येणाऱ्या काळात जास्तीत जास्त महिलांनी उद्योग व्यवसायात आले पाहिजे, त्याला प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करेल असा विश्वास बोलताना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिला.
यावेळी मुलुंड स्टेशन मास्टर मिश्रा सर, एस.एम. विकास सहाणे, CCI जितेंद्र मिश्रा, तिकीट कलेक्टर प्रसन्न कुमार,उमेश प्रसाद टीसी कर्मचारी, महेंद्र राणे कर्मचारी,कॉन्ट्रॅक्टर विष्णू भाऊ सांगळे, ओशन कंपनीचे डायरेक्टर व रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक राणे, जयप्रकाश हनुमंते, टेक्निकल एजन्सी डायरेक्टर राहुल हनुमंते, क्षमाताई गुजराती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित यावेळी उपस्थित महिला भगिनी रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या सदस्य पुष्पा कोल्हे, साक्षी महिला बचत गट मुलुंड, शोभाताई आव्हाड, भारतीताई सांगळे कल्याण ,दगडे, दिपाली शेंडगे, चेतना शिरोडकर ,अनिता पोद्दार, मानसी शेळके, प्रतीक्षा शेळके, मीना पडवळ, श्रीकृष्ण रायपूरकर, सुनील खामकर, ज्योती पाटील, क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी कुटे साहेब, कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था संस्थेच्या अध्यक्षा मंदाताई फड पुष्पा कोल्हे ऋषिकेश फड , विष्णू सांगळे, भारती सांगळे यांनी केले.
Share This