• Total Visitor ( 84621 )

महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर पतीचीही आत्महत्या

Raju Tapal November 06, 2021 34

महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर पतीचीही आत्महत्या ; हिंगोली जिल्ह्यातील घटना 

 

महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर पतीनेही दुस-या दिवशी आत्महत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे घडली.

काजल सोनू उर्फ भीमराव घोगरे वय - २० वर्षे असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव असून सोनू उर्फ भीमराव रामा घोगरे वय -२२ वर्षे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

दिवाळीनिमित्त काजलने माहेरी जाण्यासाठी हट्ट धरला होता.मात्र माहेरी जाण्यासाठी सोनुने विरोध दर्शविला. काजलला पतीचा विरोध सहन न झाल्यामुळे तिने घरातील छताला गळफास घेत आत्महत्या केली.या घटनेचा पती  सोनुवर खुपच परिणाम होवून दुस-या दिवशी त्यानेही शेतात आत्महत्या केली.

काजल व सोनुचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते.

Share This

titwala-news

Advertisement