माजी आमदार पोपटराव गावडे यांची सामान्य माणसांशी बांधिलकी ; माजी केंद्रीय कृषी मंत्री ,खासदार शरद पवार यांचे गौरवोद्गार
सामान्य माणसांशी बांधिलकी ठेवून माजी आमदार पोपटराव गावडे कार्यरत असल्याचे गौरवोद्गगार राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढले .माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सन्मान माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथे करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री पवार बोलत होते.
गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील ,बांधकाम व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्ता भरणे , खासदार अमोल कोल्हे , आमदार ॲड .अशोक पवार ,आमदार निलेश लंके, माजी मंत्री अण्णा डांगे,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ,जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे ,शिरुर नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल आदी यावेळी उपस्थित होते .
माजी केंद्रीय कृषीमंत्री ,खासदार शरद पवार यांच्या हस्ते माजी आमदार पोपटराव गावडे व त्यांच्या पत्नी जाईबाई गावडे यांना मानपत्र व गौरवचिन्ह देवून यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना पवार म्हणाले , गावडे यांचे कर्तृत्व ओळखून त्यांना ताकद देण्याचे काम केले.त्यांनीही आपले कर्तृत्व सिद्ध केले.जनतेनेही गावडेना साथ दिली. कधी काळी शिरुर तालुका दुष्काळी म्हणुन ओळखला जायचा आज दुष्काळी चित्र बदलले असून रांजणगाव हे महत्वाचे औद्योगिक केंद्र बनले आहे .
गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हणाले की सातत्याने सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम पोपटराव गावडे यांनी केले .आपल्या कामावर ,पक्षावर व पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर निष्ठा गावडे यांनी ठेवली .
प्रास्ताविक राजेंद्र गावडे यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना पोपटराव गावडे म्हणाले की तालुक्यातील विविध विकासकामे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करु शकलो . सातत्याने समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले .
दत्तात्रय जगताप व संजय बारहाते यांनी लिहिलेल्या कर्मयोगी गावडे या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले .