मनमाड शहरातील नुकसानग्रस्त भागाची आमदार सुहास कांदे वांजुमताई कांदे यांनी पाहणी केली, फुलाचे बांधकामासाठी 15 कोटी रुपये मंजूर केले
नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांनी मनमाड शहरातील नुकसानग्रस्त भागाची पूरस्थितीची पाहणी दौरा करून नुकसानग्रस्तांना दिलासा देऊन रामगुळना पांझण नदीवरील पुलासाठी 15 कोटी रुपये मंजूर केले.
आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी सोमवारी नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील रामगुळना पांझण नदीला पूर आल्यानंतर नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांचे जीवनावश्यक वस्तू संसार उपयोगी सामान हे संपूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेले. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्यानंतर नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे व त्यांची पत्नी अंजुमताई कांदे यांनी या पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. व तातडीने पंचनामा करण्याचे आदेश आमदार कांदे यांनी नांदगाव तहसीलदार सिद्धार्थ मोरे व संबंधित विभागाला दिले. यानंतर मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन पटेल, नांदगाव चे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांच्यासह कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस, नांदगाव पंचायत समितीचे अधिकारी वर्ग, यावेळेस उपस्थित होते.
तसेच आमदार सुहास अण्णा कांदे यांनी गुरुद्वाराला अन्नधान्य व जीवनशैक वस्तू या ठिकाणी देऊन नागरिकांना सहाय्यक करणाऱ्या गुरुद्वाराला एक प्रकारे मदत करून आमदार सुहास गांधी यांनी माणुसकीचा हात या ठिकाणी दाखविला आहे. मनमाड शहरातील सर्वच भागाची आमदार सुहास कांदे व त्यांच्या पत्नी अंजुमताई कांदे यांच्या सहकार्याने पाहणी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला .
मनमाड शहरात झालेल्या पूरस्थिती मध्ये आणि भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये म्हणून सदरच्या पुलाचे काम सुरू करण्यात येईल व त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. मनमाड शहरातील ग्रामस्थांशी आमदार गांधी यांनी बोलताना सांगितले की मी नुकसान झालेल्या कुटुंबीयातील महिलांशी बोलून धीर देत सर्व संस्वरूपी साहित्य व अन्नधान्य त्वरित देणार असल्याचे जाहीर केले.