मनमाडच्या अश्फाक तांबोळी च्या घराला शिवसेना शिष्टमंडळाने दिली भेट
नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील खाकी भाग येथील अशपाक तांबोळी त्यांच्या घरात 26 डिसेंबर रोजी घरात गॅस सिलेंडर ने पेट घेऊन आग लागली त्यात त्यांच्या घराचे प्रचंड नुकसान होऊन घरातील सर्व सामान जळून खाक झाले या घटनेची दखल घेऊन नांदगाव तालुक्याचे आमदार माननीय सुहास आण्णा कांदे यांनी आदेश देऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ त्यांना त्वरित अशपाक तांबोळी तिच्या घरी भेटीसाठी पाठविले. व त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.
या शिवसेनेच्या शिष्टमंडळात शिवसेनेचे जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख संतोष वळीद, तालुका उपप्रमुख सुभाष माळवतकर, दिनेश केकान, शहर संघटक कृष्णा जगताप, राहुल आहिरे हे या शिष्टमंडळात उपस्थित होते.