मानिवली सेवा सोसायटी मधून माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यासह पॅनेलने केले उमेदवारी अर्ज दाखल
मानिवली सेवा सोसायटी निवडणूकीसाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी नगरसेवक मयूर पाटील, तसेच सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा परिषद सदस्या ज्योती हिंदुराव आदि उमेदवारांनी काल अर्ज दाखल केले. कल्याण तालुक्यातील सर्वांचेच लक्ष मानिवली सेवा सोसायटीच्या निवडणूकीकडे लागले आहे.
कल्याण तालुक्यातील पंधरा सेवा सोसायटीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या मध्ये मानीवली सेवा सोसायटीचा समावेश आहे. उपनिंबधक कार्यालय कल्याण येथे उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या समवेत सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा परिषद सदस्य ज्योती हिंदुराव, रवि पाटील, दशरथ गायकर, सुरेखा पाटील, अभिमन्यु भगत, अरविंद पाटील, मंदा गायकर, तुकाराम गायकर,दिनेश जाधव, पदमाकर कोनकर, भाऊ शेलार इत्यादी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, लवकरच निवडणूका होणार असून कोणाचा झेंडा फडकणार हे लवकरच समजेल.