अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूर तालुका व यशस्विनी वेलफेअर फाऊंडेशन आयोजीत आचार्य प्र . के . अत्रे करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेत स्वामी नाट्यांगण डोंबीवली या संघाचे भगदाड या एकांकिकेस प्रथम , आपलं घर अहमदनगरच्या दोरखंड या एकांकिकेस द्वितीय व रुद्रक्षम थिएटर्स नाशिकचे पाणीपुरी एकांकिकेस तृतीय क्रमांक मिळाला .
बक्षीस वितरण लेखक दिग्दर्शक प्रशांत सुर्वे , नगरसेवक भाऊसो भोईर , विश्वास देशपांडे, शिवाजी मांढरे , प्रकाश कर्पे , पांडुरंग नरके , डॉ . धनंजय खेडकर, बाळासो शेळके , सुरेश धोत्रे , भाऊसो भोईर आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . प्रास्ताविक प्रा . रामदास थिटे यांनी करत ५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश नाट्यपरिषदेस सुपुर्द केला .
दिपाली शेळके , भाऊसो भोईर यांनी आलेल्या संघाचे स्वागत केले . या स्पर्धेत अंडीक्टेड थिएटर पुणे , नाट्य आरंभ पुणे , सृजन प्रतिष्ठाण वाशिंद - मुंबई , आपलं घर अहमदनगर , समर्थ क्रिएशन सोलापूर , रंग गंध कलासक्त न्यास चाळीसगाव , संक्रमन पुणे , स्वामी नाट्यांगन डोंबीवली , श्राफ महाविद्यालय कांदीवली , रुद्रक्षण थिएटर्स नाशिक आदी संघांनी सहभाग नोंदवला . या स्पर्धेत अभिनय पुरुष पाणीपुरीतील डोलकर भुमिकेस सतीश वराडे , द्वितीय भगदाड मधील बबनचे भुमिकेतील सिद्धेश नलावडे , उतेजनार्थ संक्रमन पुणेचे आरंभी स्मरितो मधील अथर्व तारकुंडे , दोरखंड मधील स्वराज अपुर्वा , मिस्ड बुलेट चे आकाश शिंदे , स्री भूमिकेसाठी प्रथम क्रमांक प्रतिष्ठाण वाशिंद यांचे दप्तर एकांकीकेतील आईच्या भूमिकेतील रिद्धी म्हात्रे, द्वितीय दोरखंडचे नीतू सहाणी , उत्तेजनार्थ प्रथम दप्तर चे रंजना महाब्दी , द्वितीय गर्दी चे मानसी नाटेकर , तृतीय नाट्यमय पुणे चेएम्टीनेस मधील गौतमी दातार , नेपथ्य प्रथम क्रमांक पाणीपुरी साठी माळी व प्रथमेश पाटील , द्वितीय भगद यांना बक्षिस देण्यात आले.