मराठी राजभाषा दिन गुजर प्रशालेत उत्साहात साजरा
शिरूर :- तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर )येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठी राजभाषा दिन प्रसिद्ध लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे, मराठी भाषा गौरव दिन प्रशालेमध्ये या सर्व गोष्टींचे औचित्य साधून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेतील मराठी भाषा विभाग प्रमुख प्रशालेच्या उपशिक्षिका रूपाली ढमढेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकही त्यांनी केले. प्रशालेच्या विद्यार्थिनी आर्या बोरावके, आनंदी टोणगे, तृप्ती चौधरी यांनी मराठी राजभाषा दिन आपण का साजरा करावा मराठी भाषेचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रशालेच्या विद्यार्थिनी ज्ञानदा जगताप, श्रावणी औटी, श्वेताली निर्मळ, श्रावणी कुलकर्णी, तनुष्का ढमढेरे या विद्यार्थिनींनी मराठीतील प्रसिद्ध कविता व काव्य सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या उपशिक्षिका गौरी कऱ्हेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे,जेष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर )