बहुजन समाज पार्टीच्या वतीने अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा
बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढुन प्रभाग अधिकारी प्रमोद पाटील यांची भेट घेतली व समस्याचे निवेदन दिले. कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रदीप सोनावणे,कल्याण विधानसभा प्रभारी बाळु भोसले,कल्याण ग्रामीण अध्यक्ष दिपक खंदारे, कल्याण पुर्व विधानसभा अध्यक्ष सिध्दार्थ सानावणे,विधानसभा महासचिव भीमराव खेत्रे,मंगेश ओव्हाळ, मोहने शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे,विजय माळवे आदी पदाधिकिरी
यावेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या अ प्रभागातील वॉर्ड क्रमांक 12 मधील एनआरसी टेकडी ते रामजी नगर परिसरात रस्त्याच्या बाजुला महापालिका प्रशासना कडून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे, परंतु ते काम संथ गतीने सुरू आहे, थोडे थोडे खोदकाम करतात व मध्येच सोडून देतात मातीचे ढिगारे तसेच ठेऊन देतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व शालेय विध्यार्थ्यांना खुपच त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत बहुजन समाज पार्टीच्या वतीने अ प्रभाग अधिकारी यांना दोन वेळा तक्रार केली होती, परंतु परिस्थिती तशीच आहे,
याबाबत आज शिष्टमंडळाने अ प्रभाग अधिकारी प्रमोद पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आमच्या मागण्या वरिष्ठांना कळवा जर पंधरा दिवसात मागण्या पूर्ण केल्या नाही तर मुख्यालयावर धडक देवु असे कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रदिप सोनावणे यांनी सांगितले आहे.
यावेळी अ प्रभाग अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले की तुमच्या समस्या रास्त आहेत, हया समस्या पाणीपुरवठा व बांधकाम विभाग यांच्या कडे येतात, ते अधिकारी येथील कार्यालयात बसत नाहीत महापालिका मुख्यालय मध्ये बसतात, व तुमच्या समस्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तातडीने पाठवतो तसेच अ प्रभाग मध्ये पाणी पुरवठा व बांधकाम उप अभियंता यांना येथे उपलब्ध राहण्यासाठी हि तसे पत्र वरिष्ठ अधिकारी यांना पाठवित आहे असे सांगितले.