मानखुर्दमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग....
पहाटे साडेतीनच्या सुमारास आगीची घटना,अग्निशमन दल,पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल....
राजू टपाल.
मुंबई :- मुंबईतील मानखुर्द-मंडाळा परिसरात भंगाराच्या दुकानाला शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर २०२६) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पहाटे ३ वाजून ३२ मिनिटांनी अग्निशमन दलाला मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार,मानखुर्द येथील मंडाळा परिसरात, युसूफ हॉटेलजवळ असलेल्या भंगाराच्या दुकानातील साहित्याला आग लागली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पहाटे ३ वाजून ३४ मिनिटांनी अग्निशमन दलाने या घटनेला 'लेव्हल-१' (LI) कॉल घोषित केले.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलासह पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि संबंधित वॉर्ड कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पहाटे ३ वाजून ३६ मिनिटांनी घटनेबाबत पुढील माहिती नोंदविण्यात आली.प्राथमिक माहितीनुसार,आग भंगाराच्या दुकानातील साहित्यापुरती मर्यादित असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची नोंद अद्याप झालेली नाही. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील समजू शकलेला नाही.