माता रमाईच्या स्मृती दिनी पूर्णाकृती पुतळा उभारणीची मागणी,
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त आधारवाडी येथील माता रमाबाई उद्यानात रमाई मातेचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावे याकरिता अंजिंठा फाऊंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक अजय सावंत यांच्या सह शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सुयैवंशी यांची भेट घेतली व निवेदन सादर केले, आयुक्त डॉ. विजय सुयैवंशी यांनी सकारात्मक भुमिका घेतली आहे, व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे,
यावेळी रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष अणासाहेब रोकडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव, अनिल धनगर, माजी सरपंच जगदीश धुमाळ, विनोद भालेराव , विनोद जाधव, मिलिंद परदेशी, सुधीर जगताप, आदी उपस्थित होते,
कल्याण डोंबिवली महापालिका कडून आधारवाडी येथे माता रमाबाई उद्यान उभारले आहे, त्या उद्यानात माता रमाबाई याचा पूर्णाकृती पुतळा उभारणी साठी अंजिंठा फाऊंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक अजय सावंत यांनी पुढाकार घेतला आहे, त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे सह खासदार, आमदार, जिल्हा अधिकारी, महापालिका आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे,
यावेळी अंजिंठा फाऊंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक उद्योजक अजय सावंत यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनभर साथ देणाऱ्या माता रमाबाई आंबेडकर यांचे कल्याणच्या ऐतिहासिक शहरात कुठेही पुतळा नाही, महापालिका कडून माता रमाबाई उद्यान आधारवाडी येथे बांधण्यात आले आहे, त्या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळा उभारल्यास कल्याणच्या वैभवात आणखी एक भर पडेल यासाठी आपण मुख्यमंत्री सह मंत्री महोदयांना निवेदन दिले आहे, तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय सुयैवंशी याची भेट घेतली व चौकशी केली, माता रमाई पुतळा उभारणी साठी मार्गदर्शन केले आहे, माता रमाईचा पुतळा उभारला जाईल अशी मला अशा आहे, नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल असे सांगितले,