आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांची भेट घेत आमदार विश्वनाथ भोईर यांनी मानले आभार...!
महाराष्ट्रातील आगरी समाजाची एक प्रमुख संघटना असलेल्या आगरी सेना संघटनेचे प्रमुख राजारामजी साळवी यांची कल्याण पश्चिमचे नवनिर्वाचित आमदार विश्वनाथ भोईर यांनी भेट घेतली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी यांनी विश्वनाथ भोईर यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दर्शवला होता आणि विधानसभा निवडणुकीत विश्वनाथ भोईर हे भरघोस मतांनी निवडून आले.
या जाहीर पाठिंबाबद्दल राजारामजी साळवी यांचे आभार मानण्यासाठी आणि आगरीसेने प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आगरी समाजाच्या असणाऱ्या प्रमुख मागण्यांसाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करून त्या सर्व मागण्या पूर्ण करून घेऊ असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला.
तर ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाची मोठी ताकद पाहता राज्याच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये विश्वनाथ भोईर यांच्या रूपाने आगरी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी आग्रही भूमिका यावेळी आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी यांनी व्यक्त केली.
यावेळी आगरी सेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत ठाणकर, विधानसभा संघटक/ आगरी सेना उपजिल्हा प्रमुख प्रभुनाथ भोईर, मा.नगरसेवक जयवंत भोईर, व आगरी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते...