एम.एल.जे.इंटरनँशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
राजू टपाल.
टिटवाळा :- सामाजिक शैक्षणिक बहुउदेंशीय प्रगती मंडळाची एम.एल.जे.इंटरनँशनल स्कूल वासुंद्री चा वार्षिक स्नेसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन भव्य दिव्य करण्यात आले होते.
कार्यक्रमास उपस्थिती पाहुणे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित सन्मान सत्कार एम.एल.जे. इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक अध्यक्ष मोहन जाधव व मुख्याध्यापिका मोहीनी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी छोट्या-छोट्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक असा नूत्य बहार सादरर केले. मराठी व हिंदी गाणाऱ्यावर ताल धरीत आपल्यातील कलागुणांना वाव देत सुंदर सुंदर डान्स साजर केले गेले.
यावेळी कार्यक्रमाला वासुंद्री ग्रामपंचायतच्या सरपंचा वनिता जाधव, उपसरपंच फैरोज पावले, सदस्य अरुणा पंडीत, राकेश पंडीत, दिपक कांबळे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माजी सरपंच रविश तांडेल,वंचित बहुजन आघाडीचे महासचिव संजय भालेराव, सुभाष पंडित, अशीफ पावले, माजी सरपंच प्रशांत पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 8 वार्ड अध्यक्ष महेश भोय,मुकेश पंडीत, सुभाष जाधव, पत्रकार राजु टपाल, विलास भोईर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पुनम तिवारी, सुषमा यादव, ललिता करोतिया,माधुरी डावरे, माधुरी नंदनवार,पुजा यादव, काजल क्षीरसागर, शिल्पा सिंह यांच्या सह पालक विद्यार्थी व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------- ---- -----------------