• Total Visitor ( 84514 )

मोहिलीतील कामिनी बोस्टे राष्ट्रकुल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी चाललीय न्यूझीलंडला

Raju Tapal November 21, 2022 34

मोहिलीतील कामिनी बोस्टे राष्ट्रकुल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी चाललीय न्यूझीलंडला
तिला आर्थिक मदतीची गरज समाजातील दानशूरांना केले आवाहन.  .
कल्याण तालुक्यातील मोहिली गावातली वेट लिफ्टिंग खेळाडू कामिनी गणेश बोस्टे आपल्या जिद्दीच्या जोरावर संपूर्ण राज्यातून पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत आता पर्यंत घवघवीत यश मिळवीत आपल्या गावाचे,तालुक्याचे नाव गाजवत आलेली आहे. आता तिची न्यूझीलंड येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत निवड झाल्याने येत्या २७ नोव्हेंबर रोजी ती न्यूझीलंडला रवाना होणार आहे. मात्र सदरील स्पर्धेसाठी कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान नसल्याने तसेच सदरील स्पर्धेसाठी जाण्यायेण्यासाठी काही लाखांत खर्च असल्याने तिने समाजातील दानशूर व्यक्तींकडे आपल्याला मदतीला हात मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
कामिनी बोस्टे हि गेल्या सात वर्षांपासून या खेळात प्राविण्य मिळवीत आलेली असून तिने आतापर्यंत राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन अनेक पदके देखील मिळविलेले आहे. तिने आतापर्यंत तब्बल २२ च्या वर सुवर्ण तसेच रौप्य व कांस्य पदके पटकावली आहेत. तिची आता न्यूझीलंड येथे होणाऱ्या राष्ट्रकुल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी ५२ किलो वजनी गटात निवड झालेली आहे. ती एका शेतकरी कुटुंबातील असल्याने तिचे वडील मजुरी काम करीत आहेत. सदरील स्पर्धेसाठी तिला सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदतीची गरज असल्याने ती समाजातील दानशूर व्यक्तींकडे आपल्याला मदतीची अपेक्षा करीत आहे.
तिला कल्याण पश्चिम मधील आमदार विश्वनाथ भोईर यांनी २१ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन तिला सदरील स्पर्धेत घवघवीत यश मिळावे अशी सदिच्छा व्यक्त केलेली आहे. तर बल्याणी प्रभाग क्रमांक ११ चे माजी नगरसेवक तथा कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील यांनी देखील तब्बल २५ हजारांची मदत देऊन तिच्या भावी वाटचालीसाठी तिचा आपल्या कार्यालयात बोलावून सन्मान केला आहे.
अत्यंत गरीब परिस्थितीतून आपल्या गावाचे,तालुक्याचे जिल्याचे नाव मोठे व्हावे अशी तिची मनापासून इच्छा असून ती न्यूझीलंड येथील स्पर्धेत हमखास यश मिळविणारच असा विश्वास व्यक्त करीत आहे. एखाद्या खेड्यातील मुलीने जर आपल्या जिद्दीच्या बळावर जर संकल्प करून देशपातळीवर नाव मिळविण्याचा प्रयत्न केला असेल तर तिला समाजातील दानशूर व्यक्तींनी नक्कीच मदतीचा हातभार लावावा. जर आपल्यापैकी कुणाला तिला मदतीचा हातभार लावायचा असले तर तिच्या बँक ऑफ बडोदा या वरप गावातील शाखा खाता क्रमांक ३७६२०१०००००६५८८ या खाते क्रमांकावर आपण आपली ऐच्छिक आर्थिक मदत करू शकता जेणे करून आपलाही या सामाजिक कार्याला हातभार लागेल. तिला या मदत मिळण्याकामी मोहिली गावातील अरविद पाटील व ऍड. राजू पाटील हे मदत करीत असल्याचे तिने सांगितले. आपणास अन्य काही माहिती कामिनी बोस्टे हिला विचारायचे असल्यास तिच्या 860 509 1239 या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.

Share This

titwala-news

Advertisement