मोटारसायकल व कार अपघातात एक जण गंभीररित्या जखमी
कल्याण नगर महामार्ग रस्त्यावर मोटारसायकल व कारच्या झालेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
सरळगाव बाजारातील नारायणगाव मोहप फाट्यावर स्विफ्टकार आणि मोटारसायकल हे समोरासमोर धडकल्याने दुचाकीवरून जाणारे नवरा बायको गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरमध्ये उपचार सुरू आहेत. याबात मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे करत आहेत.