मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दुसरा धक्का, शिवसैनिकांची घाऊक घरवापसी !
तर शिंदे गटात गेलेले अनेक जण स्वगृही
खोटी आश्वासने देऊन तसेच दिशाभूल करून आम्हाला नेण्यात आले होते. परंतु, काही दिवसांतच आम्हाला आमची फसवणूक झाल्याचे आणि आपण चुकीच्या लोकांच्या कळपात दाखल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आम्ही पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात परतण्याचा निर्णय घेतला, असे स्वगृही परतलेल्या पदाधिकार्यांनी सांगितले.
नाशिक :-शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे सेनेत गेलेल्या शिवसैनिकांची पुन्हा घरवापसी सुरू झाली आहे.उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शनिवारी अनेक शिवसैनिक पुन्हा स्वगृही परतले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
कालच कोकणातील नेते योगेश कदम यांच्या कट्टर समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश करीत शिंदे गटाला धक्का दिला होता. त्यानंतर आम्हाला खोटी आश्वासने देऊन आमची दिशाभूल करून आम्हाला गद्दारांच्या कळपात नेल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी या शिवसेना कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आता अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रवेश केलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अभिवचन दिले. संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत करण्यात आले.
स्वगृही परत आलेल्यांमध्ये विनोद नुनसे, स्वप्नील गायकवाड, पवन संसारे, समीर कांबळे, प्रकाश उन्हवणे, सार्थक भामरे, दादू खंडारे, सार्थक तालखेडकर, प्रवीण पवार, किशोर आहेर, अभिलाष चव्हाण, राहुल पिंगळे, चेतन पानसरे, चेतन गायकवाड, सचिन धनेधर, गणेश वाबळे, निखिल पाटील, रोहित बाविस्कर, भवन जाधव, राहुल येवले हे प्रमुख आहे,.
याशिवाय शिंदे गटाच्या नेत्यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज राजपूत, दिनेश शिंदे, भावेश पगार यांचा समावेश आहे. यावेळी या कार्यकर्त्यांनी घरवापसी झाल्याने मोकळे वाटते आहे. गेले काही दिवस आमचा कोंडमारा होत होता. आमची दिशाभूल करून शिंदे गटात प्रवेश केला होता. आश्वासने देऊन गद्दारांच्या कळपात नेले होते, असे सांगितले.या वेळी उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, कुणाल दराडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावित, माजी महापौर विनायक पांडे, शोभा मगर, शोभा गटकळ, मंगला भास्कर, विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे, राहुल दराडे, वीरेंद्र टिळे, राजेंद्र क्षीरसागर आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.