• Total Visitor ( 84315 )

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भटके विमुक्तांची मते निर्णायक ठरतील- माजी आमदार नरेंद्र पवार

Raju tapal September 30, 2021 46

मुंबई भाजपा कार्यालयात अनेकांचा पक्ष प्रवेश

 

कल्याण (प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भटके विमुक्तांची संख्या हजारोंच्या संख्येने असून मुंबई मनपा निवडणुकीत ही मते निर्णायक ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी केले

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त मुंबई विभाग आघाडीने दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश सहसंयोजक रवी कुंचिकोरवे, मुंबई प्रदेश अध्यक्ष आनंदभाऊ कुऱ्हाडे, ईशान्य मुंबई प्रभारी बाळासाहेब मोठे, दक्षिण मुंबई अध्यक्ष अनंत कोटेकर, 

गणेश नागरे, मनीष पंगती, विजय चिले,राकेश कुंचीकर्वे,  कल्पना चव्हाण व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माजी राज्यमंत्री संदेश कोंडविलकर यांच्या कन्या ऍड हर्षलताई कोंडविलकर यांनी पक्षात प्रवेश केला. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात भटके विमुक्त आघाडी बूथ स्तरापर्यंत काम करून मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडविण्यासाठी सर्वांनी तयार राहण्याचे आवाहन नरेंद्र पवार यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. मुंबईतील प्रदेशस्तर, सर्व जिल्हे, मंडळ, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच बुथस्तरापर्यंत भटके विमुक्त आघाडीचा विस्तार करण्याबाबत नियोजन करण्यात आले. यासोबतच मुंबईतील भटके विमुक्तांना येणाऱ्या अडचणी व समस्या नरेंद्र पवार यांनी समजून घेतल्या व याबाबत वरिष्ठांशी बोलून प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

 

Share This

titwala-news

Advertisement