मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालयं सील
शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली.
महापालिकेतील कार्यालयावर शिंदे गटानं दावा केला. त्यानंतर हा राडा झाला. या राड्यानंतर आता प्रशासकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहे.
महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहे. सदरचे कार्यालय मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वे तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आले आहे, अशी नोटीस पक्षांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आली आहे.
शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळं त्यांना आवर घालताना मुंबई पोलिसांची मोठी पंचाईत झाली होती. अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढलं.