मुरबाड मध्ये आयाराम गयाराम यांना प्रवेश नको
शैलेश वडनेरे यांची मागणी
मुरबाड विधानसभा होऊ घातलेल्या निवडणुकीत आयाराम गयाराम यांना प्रवेश घेणार नसल्याचे शैलेश वडनेरे यांनी सांगितले आहे.
मुरबाड विधानसभा निवडणुक जसं जशी जवळ येत चालली असून तस तशी आयाराम गयाराम यांची राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षा कडे दुसऱ्या पक्षांचे कार्यकर्ते येत असून त्यांना शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश देणार नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले असून निष्ठावंत लोकांना यावेळी संधी देणार असून आयाराम गयाराम यांना वेटींगवर ठेवण्यात आलेचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी माहिती दिली आहे.ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची असून खरी धुमाकूळ मुरबाड मतदार संघा मध्ये बघायला मिळणार आहे शैलेश वडनेरे यांना सुप्रिया सुळे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला असून येत्या दोन दिवसांत त्यांचे नाव घोषित होणार असल्याचे शैलेश वडनेरे यांनी सांगितले आहे.
राजेश भांगे मुरबाड