• Total Visitor ( 84368 )

मुरबाड नगरपंचायत मध्ये 70 नाबाद

Raju Tapal December 09, 2021 37

मुरबाड नगरपंचायत मध्ये 70 नाबाद

१०४ उमेदवारी अर्जात छाननी मध्ये ३४ उमेदवारी 
बाद

मुरबाड नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या आजच्या संभाव्य उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या दिवशी  निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत भांडे- पाटील आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी परितोष कंकाळ यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात संभाव्य उमेदवार आणि समर्थकांनी  मोठी गर्दी केली होती. मुरबाड नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी तब्बल १२५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.त्यात प्रहार जनशक्ती पक्ष, रिपाइं सेक्यूलर, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपचे संभाव्य उमेदवार होते

मा. राज्य निवडणूक आयोगकडील पत्रा नुसार नामाप्र जागांसाठी निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आलेली आहे.सबब नामाप्र जागा मुरबाड शहरातील २,५,१२,१७ या ४ वार्डात  निवडणुका होणार नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आपली नाराजी जाहीर व्यक्त केली आहे.
आज मुरबाड नगर पंचायतीच्या ओबीसी आरक्षण रद्दचे  ४ वार्ड सोडून १३ वार्डाच्या संभाव्य उमेदवारांच्या अर्जांची  छाननी करण्यात आली असून त्यात वैध नामनिर्देशन अर्जांची संख्या ७० असून अवैध नामनिर्देशन पत्रांची संख्या ३४ आहे. वार्ड क्रमांक २,५,१२,१७ हे वगळून एकूण नामनिर्देशन पत्रांची संख् या १०४ असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

Share This

titwala-news

Advertisement