नाफेडमार्फत का़ंदा खरेदी करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी २७ एप्रिलला चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र शासनाने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावा अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी केली.
बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, पंचायत समितीचे माजी सभापती अरूण चौधरी राजाराम लोखंडे, डी.डी.भोसले मयूर मोहिते, राम गोरे, राहूल नायकवाडी, काळूराम कड, माऊली शेवकरी, कुमार गोरे, विजय खरमाटे, किसन गोरे, निलेश थिगळे, भरत गोरे, मुबीन काझी, सरफराज सिकीलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.