अहवाल प्रसिद्ध करत नसल्याने शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी नाgरिकांचा बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा
--------------;---
गावातील यात्रा सलग ८ वर्षे रद्द करून शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील नागरिकांनी गावातील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करून दाखविली. मात्र वाबळेवाडी शाळेबाबत आलेल्या तक्रारींची प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली.त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करत नसल्याने संतप्त झालेल्या वाबळेवाडीतील १२५ महिलांसह २५० नागरिकांनी शुक्रवार दि.८/१०/२०२१ रोजी अचानकपणे पुणे जिल्हा परिषद गाठून आत्मदहनाच्या इशा-यासह २० तारखेपासून वाबळेवाडीत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
राज्यातील पहिली टॅबलेट शाळा म्हणून ओळख असलेल्या वाबळेवाडी शाळेबाबत जुलैपासून तक्रारी येत होत्या. प्रशासनाने चौकशीची प्रक्रियाही राबविली. शाळेचे सर्व दफ्तर मागवून घेत त्याची तपासणी करून अहवाल तयार केल्याचे गेल्या महिनाभरापासून सांगण्यात येत आहे.
काही पुढारी कारवाईचा आग्रह धरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर वाबळेवाडीकरांचा संताप अनावर झाल्याने एक बस, २५ चारचाकी गाड्यांमधून सव्वाशे महिला ,१०० युवक, व पालक यांनी थेट शिक्षण आयुक्त कार्यालय गाठले. आयुक्त जागेवर नसल्याने निवेदन त्यांच्या कार्यालयाकडे दिले.हा ताफा थेट जिल्हा परिषदेत पोहोचला. तेथील सी ई ओ कार्यालयात नसल्याने काही मोजक्या महिलांनी आपला मोर्चा जिल्हा शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांंच्या कार्यालयाकडे वळविला.
संतापलेल्या महिलांनी गेल्या आठ वर्षातील ग्रामस्थांचे शाळेसाठी योगदान, सहन केलेला त्रास शाळेचा जगभरातील लौकिक याबाबत सांगितले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा वाबळे, भारती वाबळे, निर्मला वाबळे, सुनिता वाबळे, प्राजक्ता वाबळे, शकुंतला वाबळे, योगिता वाबळे, सारिका वाबळे, स्वाती शिंदे, छाया वाबळे, श्वेता वाबळे, स्वप्नाली वाबळे, प्रज्वला वाबळे, अश्विनी वाबळे तसेच मोठ्या संख्येने प्रत्येक घरातील एक पुरूष पालक या वेळी उपस्थित होते. भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते.