नगरपंचायत निवडणुकीच्या धर्तीवर मुरबाड पोलिसांचे शहरात संचलन
Raju Tapal
December 02, 2021
30
नगरपंचायत निवडणुकीच्या धर्तीवर मुरबाड पोलिसांचे शहरात संचलन...!
मुरबाड नगरपंचायतीच्या १७ सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान व मुरबाड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका येत्या २१ डिसेंबर २०२१ रोजी मुरबाड मध्ये पार पडणार आहेत. त्या मुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे.या पार्श्वभूमीवर मुरबाड तालुक्यात या निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पाडून कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याची महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मुरबाड पोलिसांनी आज पोलीस बळाचे शक्ती प्रदर्शन करीत आज संपूर्ण शहरात पोलीस संचलन केले.
मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली मुरबाड नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मुरबाड शहरात मोठया प्रमाणावर पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थिती मध्ये संचलन करण्यात आले.
मुरबाड नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरबाड शहर मुख्य बाजारपेठ, व नगर पंचायतीच्या १७ वार्डात रिंग राउंड गस्त,पोलीस संचलन करून पोलीस सतर्कता मुरबाड मध्ये ४७ अधिकारी -पोलिसांनी दाखवली.
या संपूर्ण पोलीस शक्ती संचलनात मुरबाड पोलीस ठाण्याचे ४ वरिष्ठ पोलीस अधिकारी व २५ पोलीस अंमलदार, मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याचे १ पोलिस अधिकारी व ५ पोलीस कर्मचारी, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे १ पोलीस अधिकारी व ५ पोलीस कर्मचारी, कुळगाव पोलीस ठाण्याचे १ पोलीस अधिकारी व ५ पोलीस कर्मचारी या पोलीस संचलनात सहभागी झाले असल्याची माहिती मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली आहे.
Share This