नामनिर्देशन पत्र आजपासून दि. 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत स्विकारले जाणार
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):-भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 269 कुडाळ विधानसभा मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार आज मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालायवीत सकाळी 11 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ यांच्या दालनात स्विकारली जाणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नामनिर्देशनपत्रे भरतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी 269 कुडाळ विधानसभा मतदार संघाचे कार्यालयाच्या 100 मीटरच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रक दाखल करणाऱ्या इच्छूक उमेदवार किंवा त्यांच्या सोबतच्या व्यक्तींच्या वाहनाची संख्या जास्तीस जास्त 3 एवढी निश्चित करण्यात येत आहे. नामनिर्देशन पत्र भरतेवेळी उमेदवारासह 5 व्यक्तींना निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येत आहे.आज दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 100 मीटरच्या परिसरात कुठलीही खाजगी आस्थापना सुरु ठेवू नयेत. नागरीकांनी/अभ्यागतांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या 100 मीटर मधील शासकीय व खाजगी कार्यालयातील कामे अत्यावश्यक नसल्यास वरील दिवशी व वेळेत शक्यतो टाळावीत. अभ्यागतांचे संबंधित कार्यालयाकडे काम जर अत्यावश्यक असेल तर पोलिस विभागाने निश्चित केलेल्या पार्किंग क्षेत्रामध्ये स्वतःकडील वाहन पार्क करुन संबंधित कार्यालयाकडे पायी यावे.
निवडणूक सारखी संवेदनशील बाब असल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी अनावश्यक नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी सदरची बाब करणेत आलेली आहे. जेणेकरुन प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची देखील कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. वैद्यकीय आपत्कालीन सेवा व इतर आपत्कालीन सेवेतील वाहनांना याबाबत मुभा देण्यात आलेली असून रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली वाहने पोलिस विभागाने निश्चित केलेल्या पाकींग क्षेत्रात पार्क करुन रुग्णालयात जाण्याचे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय व परिसर सी.सी.टी.व्ही.च्या निगराणीत घेण्यात आलेला असून आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार व नागरीकांनी घ्यावी.