नंदागांव येथे आज पासून आशा व गटप्रवर्तक यांचे बेमुदत आंदोलनास सुरवात
Raju Tapal
November 25, 2021
44
नंदागांव येथे आज पासून आशा व गटप्रवर्तक यांचे बेमुदत आंदोलनास सुरवात
नांदगाव तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांनी कोरोना महामारी ही प्रचंड विनाशकारी असतानासुधा या आजारापासुन जनतेला वाचविले. व त्यासाठी अतोनात काम केले त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मार्च दोन हजार वीस मध्ये एक जीआर काढून प्रोत्साहन भत्ता दर महिन्याला एक हजार रुपये कोरोना काळ संपेपर्यंत देण्याचे जाहीर केले होते परंतु सदर ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी फक्त एप्रिल दोन हजार वीस मध्ये एकदाच फक्त एक हजार रुपये दिले. त्यानंतर पैसे दिलेच नाही. त्यामुळे आज दिनांक 25 नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत मुक्कामी आंदोलन करणार असल्याचे जिल्हा संघटक विजय दराडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाने मार्च दोन हजार वीस मध्ये काढलेल्या जीआर नुसार कोरोना काळ संपेपर्यंत देण्याचे जाहीर केले होते. परंतु ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी फक्त एप्रिल दोन हजार वीस मध्ये एकदाच एक हजार रुपये दिले होते. त्यानंतर पैसे मिळालेच नाही. त्यामुळे शेवटी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 17 जून 2021 (17 /06/ 2021 ) रोजी नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना पत्रक काढले आशा व गटप्रवर्तक यांना पैसे देण्यात यावी असे म्हटले होते. परंतु त्यानंतरही पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे आज गुरुवार दिनांक25 नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत मुक्कामी आंदोलन करणार आहोत
जोपर्यंत आशा व गटप्रवर्तक यांना ग्रामसेवक मे 2020 पासून ते आज पर्यंत चे संपूर्ण चेक ( पैसे) देत
नाहीत तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच राहील
नांदगाव तालुक्यामधील एका जरी आशा किंवा गटप्रवर्तक यांचा चेक बाकी राहील तरी आंदोलन सुरू राहील अशीही माहिती जिल्हा संघटक विजय दराडे यांनी दिली
Share This