नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव येथील वरच संकुल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद युवा संवाद यात्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात सांगण्याची वेळ येत नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी झालेल्या शरद युवा संवाद यात्रेत गौरव उदगार काढले.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आपल्या भाषणात म्हणाले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे कार्यकर्ता जोडला तर आगामी विधानसभा आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होईल यात शंका नाही. मात्र आपण निवडणुका लागल्या की तिची तयारी पंधरा दिवसात करतो. असेल न करता आतापासूनच तयारीला लागा असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले.! शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा! तुम्ही किती दिवस जगले यापेक्षा कशी जगले? ते लोकांनी नाव घेतले पाहिजे चिललराचा आवाज केला तर मोठा असतो. तर नोटांचा आवाज होत नाही. मात्र किंमत मोठी असते. आपल्याला माणसाची किंमत मोठी आहे. आपला माणूस सुरक्षित आहे. त्यामुळे युवकांनी न घाबरता अंगावर आले तर शिंगावर घेण्याची काम युवक राष्ट्रवादी काँग्रेस करावे असही महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी यावेळी आपल्या भाषणामध्ये सांगितले.
शरद युवा संवाद यात्रेच्या व्यासपीठावर असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार राष्ट्रवादी काँग्रेस नांदगाव तालुका देशी विजय पाटील, नांदगाव शहराध्यक्ष बाळ काका कलंत्री , माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, योगिता पाटील उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शरद युवा संवाद यात्रेच्या प्रसंगी नगरसेवक टिळेकर, दत्तू पवार, भगवान मोरे, सचिन जेजुरकर, सुभाष बाजीराव बागुल, शिवा सोनवणे, दया जुन्नरे, राजू नाठे, निलेश पवार, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, संपत पवार शिवा माळी, यश चव्हाण, विलास उशिरे, राहुल अहिरे तसेच नांदगाव तालुक्याचे धडाडीचे पत्रकार मुक्ताराम बागुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शरद युवा संवाद यात्रेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद भाऊ शेलार यांनी केले होते.