• Total Visitor ( 133004 )

नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतील रस्त्याचे भूमिपूजन

Raju Tapal November 21, 2021 38

कल्याण (प्रतिनिधी) कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यकाळातील स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन आज माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले

प्रभाग क्र.१५ शहाड येथील मंगेशी पॅराडाईज बिल्डींग ते मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालय शहाड या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी व सोसायटीतील नागरिक यांचेकडून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार नरेंद्र पवार यांचे  आभार मानण्यात आले. यावेळी भाजपा मोहोने टिटवाळा मंडळ सरचिटणीस श्री.संतोष शिंगोळे, श्री.अनंता पाटील, प्रभाग क्र.१५ शहाड अध्यक्ष श्री.मोहन कोनकर, मंडळ महिला मोर्चा आघाडी अध्यक्षा सौ.मनिषाताई केळकर, मंडळ सचिव श्री.निलेश कोनकर, श्री.दीपक मोगरे, महिला मोर्चा वार्ड अध्यक्ष वर्षाताई सुतार, श्री.कुणाल मिरकुटे, श्री.मच्छिंद्र कोनकर, श्री.संजय ढोणे, श्री.शशिकांत कशेळकर, श्री.नाना कोनकर, श्री.राज ढोणे आदि. मान्यवर, पदाधिकारी व परिसरातील सोसायटीचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement