शेतक-यांचे उत्पन्न वाढीसाठी कमी खर्चातील शेती करण्याची गरज; चंदनजी पाटील यांचे प्रतिपादन
विजय ढमढेरे
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेती सक्षम होणे गरजेचे असून शेतक-या़चे उत्पन्न वाढीसाठी कमी खर्चातील शेती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री चंदनजी पाटील यांनी श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती येथे केले.
श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती येथील बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्ती व संस्थांना रविवार दि.३ आॅगस्ट २०२५ रोजी समिती सभागृहात शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे नियामक मंडळाचे अध्यक्ष,जेष्ठ विधिज्ञ, अॅड.एस.के.जैन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी चंदनजी पाटील प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
स्वर्गिय कांचनभाई शहा जलव्यवस्थापन पुरस्कार पाणीदार टीम कान्हूरमेसाई,स्व.बिंदूमाधव जोशी पर्यावरण पुरस्कार ग्रामविकास फाऊंडेशन कोंढापुरी,स्व.मधुकर आण्णा टेमगिरे कृषी गौरव पुरस्कार नागरगाव येथील कांतीलाल नलगे, स्वर्गिय बबुताई बाबुराव दौंडकर कृषी गौरव पुरस्कार बुरूंजवाडी येथील नुतन प्रवीण नळकांडे, स्वर्गिय गणपत मुकिंदा खेडकर सेवाकार्य पुरस्कार महावीर की रोटी यांना तर स्वर्गिय संतोषबापू गांधी गोसेवा पुरस्कार दहिवडी गावचे सुरेंद्र महाराज देव यांना देण्यात आले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळी पुणे नियामक मंडळाचे अध्यक्ष, जेष्ठ विधिज्ञ,अॅड.एस के जैन यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून शिरूर ही देणाऱ्यांची भूमी असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अॅड.धर्मेंद्र खांडरे यांनी सांगितले, विविध क्षेत्रात निरपेक्षपणे काम करून समाजाची सेवा करणा-या कार्यकर्त्यांची आणि संस्थांची दखल घेवून, त्यांच्या पासून प्रेरणा घेवून इतरांनी देखील काम करावे या उद्देशाने बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने पुरस्कार देण्यात आले आहे.स्मारक समितीचे उपाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.सागर फराटे यांनी आभार मानले. विठ्ठल वाघ यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून उपस्थितांना परिचय करून दिला.
नारायण शिंदे, बाळासाहेब पुंडे, दत्तात्रय दरेकर,तानाजी राऊत,हेमलताताई पुंडे,प्रा.सूर्यकांत शिर्के,प्रा.प्रभाकर मुसळे कार्यक्रमास उपस्थित होते.