निलेश देशमुख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Raju Tapal
February 03, 2022
36
निलेश देशमुख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
म्हारळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच निलेश शिवाजी देशमुख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी ही निवड करून त्यांच्या कार्याची पोचपावतीच दिली आहे, अशा भावना परिसरातून व्यक्त होत आहे.कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीचे सरपंच पद कै शिवाजी देशमुख यांनी भूषविले होते. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांचा पुत्र निलेश देशमुख यांना मिळाले, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची धुरा सांभाळणे तसे अवघड होते. परंतु ती निलेश देशमुख यांनी लिलया पेलली,२००५च्या महापूरात पुरग्रस्तांना मदत,त्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड, बँकखाते,यासह त्यांच्या वसाहती मध्ये गटारे,रस्ते, सांडपाणी, पिण्याचे पाणी, सडलेले, गंजलेले लाईट चे पोल बदलने,अपघात ग्रस्तांना मदत, आदी सामाजिक कार्यात कायमच आघाडीवर असलेल्या निलेश देशमुख यांनी सामाजिक, सांकृतिक वसा देखील तितक्याच आपुलकीने जपला,सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी आदी उत्सव म्हारळ गावात मोठ्या संख्येने साजरे केले. रात्री अपरात्री,नागरिकांच्या मदतीला धाऊन जाण्याच्या परोपकारी वृत्ती मुळे त्यांना नागरिकांनी म्हारळ सारख्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बसवले, इतकेच नव्हे तर मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ सदस्यांमध्ये आख्ये पँनेल सर्वाधिक मतानी निवडून आणण्याचा चमत्कार निलेश देशमुख यांनी केला होता. आज त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी निलेश देशमुख या उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.त्यामुळे अशी सामाजिक बांधिलकी जपणारे,सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे निलेश शिवाजी देशमुख यांची राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी उपाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याने म्हारळ गावासह तालुक्यात तरुण आणि नागरिकांमध्ये आंनदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.आपण पक्ष वाढीसाठी कल्याण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात तरुणांसाठी विविध रोजगार मेळावे, महिलांना सक्षमीकरण,नागरिकांचे विविध प्रश्न, अडचणी, समस्या, सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर त्यांच्या या नियुक्ती बद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षात होत आहे.
Share This