निळजे भुयारी रस्त्याला गावकऱ्यांनी केला विरोध
मागील वर्षापासून लोढा हेवन निळजेच्या नागरिकांसाठी वाहतूक व रहदारीसाठी रेल्वे प्रशासनाने मनमानी करत बोगद्याचे काम सुरू केले आहे. हे काम झाले तर गावकऱ्यांना निसर्गाचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने काम बंद करा या मागणीसाठी गावकऱ्यांनी बुधवारी रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन निवेदन दिले.
विशेष म्हणजे निळजे स्टेशन जवळील कोळे, घेसर , वडवली गावांना जोडणारा हा भुयारी मार्ग फाटक बंद करून तयार करण्यात येत आहे खरे तर छोट्या गाड्या व दुचाकी वाहने भुयारी मार्गातून जाऊ शकतील मात्र त्यातून स्थानिक नागरिकांना जाण्यासाठी सोयच नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. गावात बांधकाम करण्यासाठी मोठी वाहने येण्यासाठी किंवा बांधकाम करण्यासाठी या पर्यायी भूयाराचाकाहीही उपयोग नसल्याने या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी लावून धरली आहे. निळजे स्टेशन जवळ होत असलेल्या भुयारी सखल भागात असल्याने पावसाळ्यात पाणी साचून आजूबाजूच्या गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पावसाळ्यात त्रासदायक
होणार असल्याने लोढा हेवन पलावा सारख्या शहरात पावसाची अतिवृष्टी होऊन संपूर्ण परिसर जलमय होत असतो आणि लोढा हेवन परिसरात शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते पर्यायी व त्यातून जलप्रवाह गावात येऊन परिस्थिती जलमय होऊन गावातील घरांचे आणि मालमत्तेचे येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते अशी भीती गावातील नागरिकांना आहे त्यामुळे ग्रामविकास समितीने लोढा निळजे भुयारी मार्गाला तीव्र विरोध केला आहे स्टेशन जवळ होत असलेल्या भुयारी बोगद्याचे काम तातडीने बंद करावी अशा मागणीचे पत्र ग्रामविकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज रेल्वेच्या प्रबंधकांना दिले.
यावेळी समितीचे प्रकाश परशुराम पाटील,विश्वनाथ रसाळ,महेंद्र धर्मा पाटील, निवृत्ती चंद्रकांत पाटील , रवींद्र धर्मा पाटील पाटील, विलास पाटील अभिजित पवार, नितीन पाटील देवीदास पाटील, महेंद्र म्हात्रे, राज पाटील, अविनाश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.