निमगाव ता.खेड येथील खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला झटका
Raju tapal
October 11, 2021
34
निमगाव ता.खेड येथील खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला झटका ; पोलीसांनी वाचविले प्राण
-------------------
खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला हृदयविकाराचा झटका आला. भाविकाला वाचविण्याचे कर्तव्य खेड पोलीसांनी पार पाडले.
जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील प्राचार्य केशव नामदेव बोरकर वय-५३ मुलगी तन्वी बोरकर , मुलगा उपेंद्र बोरकर हे खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते. रांगेत उभे राहून मंदिराच्या गाभा-यात दर्शनासाठी गेले होते.
केशव बोरकर यांना अचानक चक्कर येवून गाभा-यातील फरशीवर कोसळले. तोंडातून फेस येवून बेशुद्ध पडले. या घटनेमुळे भाविकांची पळापळ झाली. या ठिकाणी बंदोबस्त करीत असलेले खेड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मोहन अवघडे, सचिन गिलबिले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून गाभा-यातील भाविकांची गर्दी हटविली.
बेशुद्ध अवस्थेत असलेल्या बोरकर यांच्या छातीवर १० ते १५ मिनिटे पंपिंग केले. खाजगी वाहन बोलावून राजगुरूनगर येथील जीवन रक्षा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले. पोलीस हवालदार मोहन अवघडे,सचिन गिलबिले यांनी तात्काळ मदत करून मला मरणाच्या दारातून बाहेर काढले अशी प्रतिक्रिया प्राचार्य केशव बोरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
बोरकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
Share This