निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी केले मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
Raju tapal
October 19, 2024
42
१४४- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी/ कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण संपन्न!
निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी केले मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन!
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या पार्श्वभूमीवर १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी/ कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण आज डोंबिवली पूर्व येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे दोन सत्रात संपन्न झाले. निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी मतदान प्रक्रियेच्या कामकाजासंदर्भात उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामध्ये पायाभूत प्रशिक्षण व EVM प्रशिक्षण अशा स्वरूपातील प्रशिक्षण, उपस्थित मतदान अधिकारी/ कर्मचारी यांना देण्यात आले.पहिल्या सत्रातील प्रशिक्षणाला सुमारे 800 म्हणजे 89% अधिकारी/कर्मचारी वर्गाने उपस्थिती दर्शविली. या समयी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रद्धा चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होत्या. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील कल्याण लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांना विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
दुसऱ्या सत्रात उपस्थित अधिकारी वर्गास EVM प्रात्यक्षिकाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अधिकारी कर्मचारी वर्गात आज प्रशिक्षण देण्यात आले असून निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल असा विश्वास 144 कल्याण ग्रामीणचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी यावेळी व्यक्त केला.
144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात एकूण 434 मतदार केंद्र आहेत.
Share This