• Total Visitor ( 84466 )

कल्याण पश्चिममध्ये इतिहास घडण्याच्या उंबरठ्यावर

Raju tapal November 20, 2024 125

कल्याण पश्चिममध्ये इतिहास घडण्याच्या उंबरठ्यावर !!

आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे मतदान होत असून कल्याण पश्चिमचे लोकप्रिय उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांनी सहकुटुंब मतदान केले आहे. याप्रसंगी सोबत माजी भाजप आमदार नरेंद्र पवार हे देखील आले होते.  मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि नरेंद्र पवार यांची साथ पाहता कल्याण पश्चिम इतिहास घडण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा विश्वास कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचा उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांनी व्यक्त केला. 

 कल्याणचा विकास करणे महायुती शिवाय कोणाला शक्य नाही हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे एवढ्या सकाळी मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. जनता महायुतीच्या बाजूने भरभरून मतदान करणार हे जनतेकडून अपेक्षित आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला महाराष्ट्रात महायुती मोठ्या ताकदीने महाराष्ट्राची सत्ता काबीज करेल.

सर्वसामान्यांचे सरकार या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येणार आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणार असा ठाम विश्वासही विश्वनाथ आत्माराम भोईर यांनी यावेळी व्यक्त केला. 

तर मतदान जनजागृती साठी सर्वच स्तरांवर प्रयत्न झाले आहेत. तसेच महायुती सरकारने केलेले काम पाहता मोठ्या संख्येने मतदार मतदानाला उतरलेले पाहायला दिसत आहेत. महायुतीने ज्या पद्धतीने काम केलं आहे लोकांना आशा आहे की हे जनतेचे सरकार सर्व सर्वांचे भलं करू शकते. त्यामुळे मतदारराजा मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर रांग लावून मतदानासाठी उभा आहे.

यावेळी विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, मा.नगरसेविका वैशाली भाईर, सुप्रिया भोईर, वैभव भोईर, विशाखा भोईर, मानसी भोईर या सर्व कुटुंबियांनीही एकत्रितपणे आपला मतदानाचा हक्क बजावला.
 

Share This

titwala-news

Advertisement