• Total Visitor ( 84251 )

अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस

Raju tapal October 28, 2024 24

अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; 
महायुती-महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम 

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत, पण अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीने आपले सर्व उमेदवार घोषित केले नाहीत. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र अद्याप दोन्ही गटांनी 288 जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दोन्ही म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप तिढा कायम आहे.

महाविकास आघाडीने आतापर्यंत 239 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत, तर महायुतीने 215 उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही आघाड्यांच्या जवळपास एक चतुर्थांश जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. महायुतीने अद्याप 73 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत तर महाविकास आघाडीने 49 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महाविकास आघाडीने आतापर्यंत 288 पैकी 239 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसकडून 87, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून 85 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून 67 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

उर्वरित जागांबाबत वाद सुरू असून, यासाठी सातत्याने मविआत चर्चांचे सत्र सुरू आहे. आज-उद्या उर्वरित उमेदवार जाहीर होऊ शकतात. त्याचबरोबर महायुतीकडून 215 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने सर्वाधिक 121 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून 45 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 49 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 73 जागांबाबत महायुतीत वाद सुरू असून, सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. आज-उद्या महायुतीचीही अंतिम यादी येऊ शकते.
 

Share This

titwala-news

Advertisement